प्रकरण 1. भू-हालचाली पृथ्वीच्या पृष्ठभागावर टेकड्या , पर्वत , दर्या इत्यादी भूरूपे आपण नेहमी पहात असतो. या भूरुपांची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत व बहिर्गत बलांमुळे होते. याच्या आधारे भू हालचालीच्या दोन प्रकार पडतात भू-हालचालीचे दोन प्रकार पडतात :- अ. मंद हालचाली – पर्वतांची निर्मिती व खंडांचे वितरण ब. शीघ्र हालचाली – भूकंप व ज्वालामुखी भू-हालचालीचे पुरावे :- 1. 2004 च्या सुनामीनंतर , सुमात्रा बेटाच्या किनार्याची ऊंची काही सेंटिमीटर्सने वाढली 2. सुनामीनंतर काही बेटे लुप्त झाल्याचे निदर्शनास आले. उदा. मेगापोड. अ. मंद हालचाली :- अंतर्गत बलांमुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्यांना भूविवर्तनकी हालचाली असे म्हणतात. या हालचालीच्या दिशांनुसार त्यांचे 1. ऊर्ध्वगामी आणि 2. क...