प्रकरण 1. भू-हालचाली

       पृथ्वीच्या पृष्ठभागावर टेकड्या, पर्वत, दर्‍या इत्यादी भूरूपे आपण नेहमी पहात असतो. या भूरुपांची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत व बहिर्गत बलांमुळे होते. याच्या आधारे भू हालचालीच्या दोन प्रकार पडतात

 भू-हालचालीचे दोन प्रकार पडतात :-

       अ. मंद हालचाली – पर्वतांची निर्मिती व खंडांचे वितरण

       ब. शीघ्र हालचाली – भूकंप व ज्वालामुखी

भू-हालचालीचे पुरावे :-

       1. 2004 च्या सुनामीनंतर, सुमात्रा बेटाच्या किनार्‍याची ऊंची काही सेंटिमीटर्सने वाढली

       2. सुनामीनंतर काही बेटे लुप्त झाल्याचे निदर्शनास आले. उदा. मेगापोड.

अ. मंद हालचाली :- अंतर्गत बलांमुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्यांना भूविवर्तनकी हालचाली असे

   म्हणतात. या हालचालीच्या दिशांनुसार त्यांचे

       1. ऊर्ध्वगामी आणि

       2. क्षितिज समांतर

       असे दोन गट केले जातात.

  1. ऊर्ध्वगामी हालचाली (खंड निर्माणकारी):-

       अंतरंगातील बलांमुळे व ऊर्जेच्या वहनामुळे हालचाली निर्माण होतात. पृथ्वीच्या केंद्राकडून भुपृष्टाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे या हालचाली अति मंद गतीने होत असतात. या हालचालीमुळे भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते. म्हणून या हालचालींना खंड निर्माण करणार्‍या हालचाली म्हणतात.

2. क्षितिज समांतर (पर्वत निर्माणकारी) हालचाली :-

       या हालचाली क्षितिज समांतर दिशेत कार्य करतात. बलाच्या दिशेनुसार या हालचालीमुळे खडकांच्या स्तरात ताण किंवा दाब निर्माण होतो. या हालचालीमुळे भूपृष्ठास वळ्या, घड्या, भेगा पडतात. या हालचालीमूळे पर्वताची निर्मिती होते व यांचा वेग जास्त असतो.

       या हालचालींना पर्वत निर्माण करणार्‍या हालचाली असे म्हणतात.

       या बलाचे दोन गट पडतात.

       a) ताण निर्माणकारी बले :-

       b) दाब निर्माणकारी बले :-

 

 

a) ताण निर्माणकारी बले :-

      बले जेव्हा एकमेकांपासुन विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा ताण निर्माण होतो. त्यामुळे खडकाच्या थरामध्येही ताण निर्माण होतो. या प्रक्रियेमुळे भूपृष्ठाला छेद, भेग, किंवा तडे पडतात.त्यामुळे खचदरी किंवा गट पर्वतांची निर्मिती होते.

       आकृती - ताण निर्माणकारी बल

 

) दाब निर्मा णकारी बले :

     बले जेव्हा एकमेकांच्या दि शेने कार्य करतात तेव्हा त्यांना केंद्रि बल असेही म्हणतात. या बलांमुळे खडकांच्या स्तरावर दाब निर्मा होऊन भूपृष्ठास बाक येणे, वळ्या पडणे किंवा भेगा पडणे या क्रिया घडतात.

    आकृती - दाब निर्माणकारी बल

 

वलीकरण :

       भूपृष्ठाला पडणाऱ्या वळ्यांचे स्वरूप हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. यामध्ये खडकांचे स्वरूप, बलाची तीव्रता आणि बलाचा कालावधी या घटकांचा समावेश होतो. मृदु लवचिक खडकांवर त्याचा प्रभाव जास्त पडतो. ज्यावेळी खडकाच्या स्तरांमधून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात त्यावेळी वळ्या निर्मा होतात. वलीकरणाची प्रक्रिया ही वली पर्वताच्या निर्मितीस कारणीभूत ठरते. उदा.हिमालय, रॉकी, अँडीज. दाब निर्माणकारी बलामुळे खडकाला तेव्हाच वळ्या पडतात जेव्हा खडक लवचि असतो. भूकवचात खोलवर असलेले खडक प्रचंड दाबाखाली असल्याने सामान्यतः ते लवचिक असतात.

 

वलीचे भाग :

     भूकवचात वळ्या निर्मा होतात. वळ्यांच्या दोन्ही बाजूंना भुजा असे म्हणतात. अक्षीय प्रतल वळ्यांचे  दोन भाग करते. अक्षीय प्रतल हे उर्ध्व दिशेत, क्षितिज समांतर स्थितीत किंवा तिरपे असू शकते. जेव्हा मध्य भाग अधि उंचीवर असतो त्याच्या भुजा अधोमुखी असतात, त्या वलीस अपनती वली म्हणतात. याउलट, जेव्हा वलीचा मध्यभाग कमी उंचीवर असतो त्याच्या भुजा मध्यभागी एकमेकांकडे उतरतात तेव्हा त्या वलीस अभिनती वली असे म्हणतात.

     आकृती - वलीचे भाग

वलीचे पर्वत :

     वलीकरणामुळे वलीपर्वतांची निर्मिती होते. उदा. हिमालय, अल्प्स पर्व . वयोमानानुसार वली पर्वतांचे दोन प्रकार

केले जातात.

) प्राचीन वली पर्व

      २०० दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झालेले उदा. अरवली (भारत), उरल पर्व (रशिया) ॲपेलिशियन. सध्याचे अरवलीतील सर्वोच्च शिखर १७२२ मी.आहे.

) अर्वाचीन वली पर्व

     सुमारे १० ते २५ दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झालेले उदा. रॉकी हिमालय. हिमालयाची सर्वोच्च उंची ८८४८ मी. आहे.

वलीचे प्रकार :

) सममित वली : ) अक्षीय प्रतल उर्ध्वगामी

              ) वलींच्या भुजांचा उतार समान असतो.

) असममित वली : ) अक्षीय प्रतल कललेले

                ) वलीच्या भुजांचे कोन कमी जास्त असतात.

) उलथलेली वली : ) वलीची एक शाखा दुसऱ्या शाखेवर झुकलेली असते.

               ) भुजांचा उतार एकाच दिशेने असतो मात्र कोन कमी जास्त असतात.

) आडवी वली : ) एक वली दुसऱ्या वलीवर क्षितिज समांतर विसावलेली असते.

             ) वळ्या एकाच दिशेने वळलेल्या असतात.

) समनतिक वली : ) सरळ वळ्या

                ) अक्षीय प्रतल ऊर्ध्वमुखी, झुकलेले किंवा क्षितिज समांतर

                ) वळ्यांच्या भुजा एकमेकांस समांतर

Comments